Monday 12 September 2011

हुबेहुब अनुकरण करा

तुम्हाला श्रीमंत व्हायचंय?


एकदम सोपा उपाय...


श्रीमंत व्यक्तींचं हुबेहुब अनुकरण करा.


नाही... अवघड बाबींमध्ये जमत नसेल तर सोप्या गोष्टींचं अनुकरण करा. 


चला वरपासून खालपर्यंत सर्व पर्यायांचा विचार करू.


एक श्रीमंत व्यक्ती शोधा.


हे काही फार अवघड नाही.  जरा प्रयत्न केलात तर किमान एक श्रीमंत व्यक्ती तुम्ही शोधालच.


आता ह्या श्रीमंत व्यक्तीच्या घरासारखं हुबेहुब घर बनवा आणि त्यात राहा.


काय नाही जमणार?  याहून सोपा उपाय हवा? ठीक आहे...


निदान ह्या व्यक्तीच्या घराला जसा दरवाजा आहे तसाच हुबेहुब दरवाजा बनवून घ्या. 


काय नाही जमणार?  याहून सोपा उपाय हवा? ठीक आहे...


निदान ह्या व्यक्तीच्या घराच्या दरवाजाला जसं कुलुप आहे तसंच हुबेहुब कुलुप बनवून घ्या. 


काय नाही जमणार?  याहून सोपा उपाय हवा? ठीक आहे...


निदान ह्या व्यक्तीच्या घराच्या दरवाजाच्या कुलुपाला जशी किल्ली आहे तशीच हुबेहुब किल्ली बनवून घ्या. 


आता तुम्हाला एवढं जरी जमलं तरी श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही.

(वैधानिक इशारा: सद्सदविवेक बुद्धी जागृत असणार्‍यांनी या उपायांचा अवलंब करू नये.)